Sunday, August 5, 2018

शंख फुंके


शंख फुंके

पुण्यात आजकाल कशाचे कलासेस निघतील किंवा कोणावर कशाचे भूत सवार होईल हे सांगणे कठीण आहे. गेल्या महिन्यापासून आमच्या परिसरात शंख वादनाचे वर्ग सुरू झाले आहेत. सुरुवातीला फारसे जाणवले नाही पण आता "जमायला लागल्यापासून" भरपूर शंखाचे आवाज घर बसल्या ऐकायला यायला लागले आहेत. माझा या वर्गांना आणि शंख वादनाला पूर्ण पाठिंबा आहे. संध्याकाळच्या असह्य ढोल वादनांपेक्षा हे फार सुसह्य आहेत पण इथे मुद्दा आहे की हे किती दिवस ऐकावे लागणार? बरं, हे क्लास शनिवारी आणि रविवारी सकाळी असतात. साधारणपणे आमच्यासारखी आठवडाभर कामाला जुंपलेली मंडळी वीकएंड ला जरा उशिरा उठतो (माझ्या मते यात गैर काही नाही). पण या शंख वादनाने पहाटे पासूनच झोपमोड होते. मनात विचार येतो, मुसलमान मंडळींनी पहाटे दिलेली बांग आणि हे आवाज याची वेळ एकच, त्रासही एकच. त्यांना आपण विरोध करतो, मग याचे काय? या बाबत याचे वर्ग आयोजक आणि त्यांचे उत्साही विद्यार्थी काही विचार करतील काय?

- मंदार कुलकर्णी

1 comment:

  1. मंदार सर तुम्ही फारच छान लिहता !!!भारी अप्रतिम

    ReplyDelete