Saturday, July 7, 2018

१२५शब्द

असाच एक कामाचा आणि गडबडीचा दिवस. ठिकाण कर्वेनगर. सकाळची वेळ. काही मुली भराभर कॉलेजला जाण्यासाठी पटापट रस्त्यावरून जात होत्या. प्रत्येकीच्या हातात मोबाईल आणि कानात इयर फोन. सारखं कोणाशीतरी बोलत असतात किंवा गाणी ऐकत असाव्यात. त्यांची इतकी घाई की चौकात रस्ता ओलांडताना डावीकडे उजवीकडे पहायचे ही भान नाही. आणि त्याची त्यांना फिकीर ही नाही. रस्त्यावरून जाणारे वाहन चालक त्यांचा अंदाज घेऊन आपली गाडी चालवणार. आता सवय झालीय त्यांना.

पुढचा चौक. एक रस्ता साफ करणारी महानगरपालिकेची बाई. डोक्यावर एक पाटी आणि त्यात एक झाडू. रोजचेच काम तिचे. आपण रस्ता घाण करायचा आणि त्यांनी त्याची सफाई करायची. म्हणूनच त्यांना सफाई कामगार म्हणतात. ती बाई रस्ता पार करताना नीट डावीकडे उजवीकडे पाहते आणि अतिशय सावकाश आणि आपले पुढचे काम चालू करते.

मला सांगा कोण शिक्षित आणि अशिक्षित?

- मंदार कुलकर्णी
८ जुलै २०१८
#१२५शब्द

1 comment:

  1. मंदार सर तुम्ही फारच छान लिहता बर का !!! भारी अप्रतिम
    आपलाच एक वाचक सोपान !!!!

    ReplyDelete